1 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल
मुंबई महानगरात जलमार्गाचे 340 किलोमीटर पर्यंत वाढवणार
1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23487 कोटी रुपये किंमतीचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन.
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 22862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारले.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याची योजना.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात असून दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न केले जातील. राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. तसेच 2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत. वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारण्यात येणार असून नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याचा रोडमॅप तयार करण्यात येईल.
दरम्यान बुलेट ट्रेन तीन स्थानकाच 2027 पर्यंत पूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 70 टक्के लोकसंख्या होणार आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे. तीसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास कामे होतील. मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यात 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले असून मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील
नव्या योजनांची घोषणा
- गोपिनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
- 30 हजार किलोमिटरहून जास्त काम झाली आहेत
- टप्पा 3 मध्ये 23 हजार किमी रस्त्याची व पुलाची काम करणार आहे
- पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
- राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे
- प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील
नव्या योजनांची घोषणा
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना
महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना
देवेंद्र फडणवीसांच्या 5 मोठ्या घोषणा
अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार
अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार
देहूमध्ये विकास आराखड्याची घोषणा
महाराष्ट्र शेती अभिनय नव्या योजनेची घोषणा
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण
प्रादेशिक संतुलित विकास साधण्यासाठी चार स्तंभे
प्रगतीशील, शासक,सर्वसमावेशक, सुशासन अशी 4 स्तंभे
विकसित महाराष्ट्रासाठी 16 उपक्षेत्रे निश्चित